मद्यधुंद बीएमडब्ल्यू चालकाची दोघांना धडक

नशेत तो गाडी वेगात चालवत होता. किडवाई मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना न जुमानता त्याने वेगात गाडी पळवली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

मद्यधुंद बीएमडब्ल्यू चालकाची दोघांना धडक
SHARES

रे रोड परिसरात मद्यधुंद अवस्थेत एका बीएमडब्ल्यू चालकाने शनिवारी रात्री दोन जणांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात त्या परिसरातील चार गाड्यांचं नुकसान झालं अाहे.  या प्रकरणी भायखळा पोलिसांनी मेहबूब आलम (२५) या तरुणाला गुन्हा नोंदवत अटक केली आहे.

पोलिसांना जुमानलं नाही

भायखळा परिसरात राहणारा आलम हा काही महिन्यांपासून त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरी कामाला होता. त्याचा मालक अधून-मधून कामानिमित्त दुबईला जातो.  शनिवारी मालकाला सोडण्यासाठी आलम मुंबई विमानतळावर गेला होता. तेथून परतताना त्याने मद्यप्राशन केले.  नशेत तो गाडी वेगात चालवत होता. किडवाई मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना न जुमानता त्याने वेगात गाडी पळवली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

चार गाड्यांना धडक

रे रोडवर त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून चालत असलेल्या दोघांना धडक देत अाणखी चार गाड्यांना धडक दिली. अपघातानंतर त्याने पळ काढण्याचा आत पाठलाग करत असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं.  पोलिसांनी भायखळा पोलिसांना आलमचा ताबा दिला असून भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.



हेही वाचा -

कारवाईचा सूड घेण्यासाठी वाहतूक पोलिसाचीच दुचाकी पळवली

साकीनाक्यात शौचालयाचं दार ठोठावल्यानं एकाची हत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा