कारवाईचा सूड घेण्यासाठी वाहतूक पोलिसाचीच दुचाकी पळवली

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर बरकतची ओळख पटवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने वाहतूक पोलिसांकडून वांद्रे परिसरात वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईला कंटाळून सूडेच्या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली दिली.

कारवाईचा सूड घेण्यासाठी वाहतूक पोलिसाचीच दुचाकी पळवली
SHARES

वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या रिक्षाचालकाने सूड घेण्यासाठी वाहतूक पोलिसाची दुचाकी पळवल्याची घटना वांद्रे येथे घडली. मात्र, पोलिसांनी २४ तासात दुचाकीचा शोध घेत रिक्षाचालक बरकत अली शेख याला अटक केली.

सीसीटीव्हीची मदत

वांद्रे वाहतूक चौकीत कार्यरत असलेले पोलिस शिपाई संदीप महामुनी हे गुरुवारी रंगशारदा जंक्शन येथे ड्युटीवर होते. दुपारी जेवण्यासाठी ते वाहतूक चौकीजवळ आले. चौकीपासून काही अंतरावर त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली होती. दुचाकीच्या डिकीत वॉकीटॉकी संच आणि ई-चलन मशिन होते. जेवण करून आल्यानंतर त्यांना दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. आजूबाजूला विचारपूस करूनसुद्धा दुचाकीचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे जवळच असलेल्या एका दुकानाचे सीसीटीव्ही त्यांनी पडताळले. त्यावेळी एक रिक्षा चालक त्यांची दुचाकी चोरून नेत असल्याचं निदर्शनास आलं.

वाॅकीटाॅकीने माग

संदीप यांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला देत वाॅकीटाॅकी दुचाकीच्या डिकीत असल्याचं सांगितलं. त्यानुसार नियंत्रण कक्षाने त्या वाॅकीटाॅकीचा माग काढला. त्यानुसार संदीप यांची दुचाकी काही अंतरावर एका गल्लीत आरोपीने पार्क केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर बरकतची ओळख पटवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने वाहतूक पोलिसांकडून वांद्रे परिसरात वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईला कंटाळून सूडेच्या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली दिली.  या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.



हेही वाचा -

साकीनाक्यात शौचालयाचं दार ठोठावल्यानं एकाची हत्या

सराईत ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा