नोकरीच्या आमिषानं बलात्कार करणारा अटकेत

 Dahisar
नोकरीच्या आमिषानं बलात्कार करणारा अटकेत

दहिसर - नोकरी देण्याचं आमीष दाखवून सागर सोळंकी नावाच्या एका 30 वर्षांच्या व्यक्तीनं एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

सोळंकी सावरेपाडा परिसरात राहत होता. एका पॅकिंग कंपनीत नोकरीसंदर्भात ही महिला दूरध्वनीवर बोलत असताना त्यानं ऐकलं होतं. नंतर त्याने तिच्याशी ओळख काढली आणि वाढवली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. नोकरी देतो म्हणून तो तिला भेटायला बोलवू लागला. कधी संजय गांधी नॅशनल पार्क, तर कधी भाईंदर खाडी अशा अनेक ठिकाणी तो या महिलेला घेऊन गेला. नंतर त्यानं तिच्याबरोबर शरीरसंबंधही ठेवले. नोकरीच नव्हे, तर लग्नाचं आमीषही सोळंकीनं या महिलेला दाखवलं. काही काळानं सागर तिला टाळू लागला. त्यानं महिन्याभरात एकदाही फोन न केल्यामुळे या महिलेला संशय आला आणि तिनं 29 डिसेंबरला कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कस्तुरबा पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेत सोळंकीला 3 जानेवारी रोजी अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments