• गोरगावमध्ये लाखो रूपयांची बनावट दारू जप्त
SHARE

गोरेगाव - लिंक रोड परिसरातील एका दारूच्या अड्ड्यावर गुरुवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. या वेळी पोलिसांनी लाखो रुपयांची बनावट दारू जप्त केली. यात विदेशी ब्रँडच्या दारूचा समावेश होता. तसेच पोलिसांनी दोघा आरोपींनाही अटक केली.

गोरेगाव येथील लिंक रोडजवळ असलेल्या एका दारूच्या अड्ड्यावर बनावट दारू विकली जात असल्याची माहिती एक्साइज डिपार्टमेंटला मिळाली होती. विदेशी ब्रँडच्या बाटलीमध्ये बनावट स्कॉच भरली जायची. त्यानंतर या बनावट दारूचा हॉटेल, पब आणि बियर बारमध्ये पुरवठा केला जायचा. त्यानुसार छापा मारून पाच लाखाची बनावट दारू जप्त करण्यात आली, अशी माहिती अंधेरी डिविजनचे वरिष्ठ पोलीस वैभव वैद्य यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या