ईडी आणि मुंबई पोलिस पुन्हा आमने-सामने

सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल करून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जवळचा अमित चांदोळेला अटक केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी ईडीप्रकरणातील तक्रारदाराविरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे.

ईडी आणि मुंबई पोलिस पुन्हा आमने-सामने
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई आणि बिहार पोलिसांमधला वाद चवाट्यावर आला होता. या घटनेला काळी काळ उलटत नाही. तोच टॉप्स ग्रुप प्रकरणात आता ईडी आणि मुंबई पोलिस एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.  सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल करून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जवळचा अमित चांदोळेला अटक केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी ईडीप्रकरणातील तक्रारदाराविरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी हा गुन्हा दाखल केला.

हेही वाचाः-   १६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरुस्तीला यश      

ईडीने टॉप्स ग्रुपप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांतील तक्रारदार व टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्याविरोधात शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यावतीने याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. भादंवि कलम ४०६, ४०९,४२०, ४६८, ४६९, १२०(ब)व ३४ सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली. अय्यर यांच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीत करण्याता आली होती. तक्रारीनुसार, आरोपींनी बोर्ड मिटींगमधील मिनिट्समध्ये फेरफार केले, तसेच डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केला, बनावट अकाउंट, बॅलान्सशीट वापर केला, ग्राहकांकडून आलेले रक्कम दुसरीकडे वळती केली, २१.५९ कोटींचे चुकीचे खर्च दाखवले, तसेच आरोपींनी केलेल्या एका व्यवहारातून कंपनीला ६.३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, कंपनीचे ग्राहक विरोधकांकडे वळवले, त्यामुळे कंपनीला ७८.१२ कोटींचे नुकसान झाले असे विविध आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. नंदा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीवरून आता हा नवा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दाखल केला.

हेही वाचाः- कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल बेस्टचा 'या' ऑर्गनायझेशनकडून गौरव

दरम्यान, यापुर्वी  टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्या तक्रारीवरून यलो गेट पोलिस ठाण्यात टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यासह आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणीही आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले होते. त्यातील २२ आरोपांपैकी एमएमआरडीएतील कंत्राटातील कथिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडी तपास करत आहे. त्यात मनी लाँडरींग झाल्याचा ईडीला संशय आहे. त्याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलाला ईडीने समन्स पाठवले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा