सिद्धीविनायक लॉजिस्टिक गैरव्यवहार : ६ हजार गाड्यांवर ईडीची टाच

कंपनीच्या चालक से मालक व इतर योजनांतर्गत वाहन खरेदी करणारा, बॅंक व कंपनीमध्ये करार करण्यात आले. पण प्रत्यक्ष पडताळणीत बॅंकांना पुरवण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

सिद्धीविनायक लॉजिस्टिक गैरव्यवहार : ६ हजार गाड्यांवर ईडीची टाच
SHARES

मे. सिद्धीविनायक लॉजिस्टीक लि. या कंपनीच्या गैरव्यवहारातून ६ हजार १७० वाहनांची खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी सक्तवसुली संचलनालयनं (ईडी) या गाड्यांवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे. सुमारे २ हजार कोटींच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे.


चालक से मालक

मे. सिद्धीविनायक लॉजिस्टीक लि. कंपनीच्या 'चालक से मालक' या योजने अंतर्गत ४ राष्ट्रीयकृत बँकांमधून २ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं. सुरूवातीचे काही काळ गाड्यांचे हप्ते भरण्यात आले. मात्र, कालांतराने कर्जातील १५९० कोटी रुपये कंपनीनं थकवले. या प्रकरणी कंपनीचे संचालक रूपचंद बैद आणि इतर आरोपींविरोधात २०१३ मध्ये सीबीआयनं (केंद्रीय अन्वेषण विभाग) गुन्हा दाखल केला. त्याप्रकरणातील ११७ कोटी रुपये बोगस कंपन्यांच्या मार्फत व्यवहारात आणून मनी लाँड्रींग झाल्याची बाब तपासात निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी ईडीनंही तपासाला सुरूवात केली होती.


बनावट कागदपत्रं

बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं हे कर्ज घेण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. यापूर्वी याप्रकरणी गाड्या व हॉटेल, तसंच कार्यालयांवर ईडीनं टाच आणली होती. संचालक बैद यांना अटक देखील झाली होती. कंपनीच्या चालक से मालक व इतर योजनांतर्गत वाहन खरेदी करण्याचा करार बँक व कंपनीमध्ये करण्यात आला. पण प्रत्यक्ष पडताळणीत बँकांना पुरवण्यात आलेली कागदपत्रं बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यात काही कर्मचारी व चालकांना कोणतीही माहिती न देता कर्ज घेण्यात आल्याचा प्रकारही घडल्याचं निष्पन्न झालं. अखेर याप्रकरणी ईडीनं २०१७ मध्ये मालमत्तांवर टाच आणण्यास सुरूवात केली होती. पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत ईडीनं ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. तपासादरम्यान कर्जाच्या रकमेचा करारानुसारही वापर करण्यात आला नाही. बोगस कंपनीच्या मार्फत ती रक्कम काढून तिचा वैयक्तीक वापर करण्यात आला. याप्रकरणी सीबीआयनं गेल्यावर्षी आरोपपत्र दाखल केलं होतं.



हेही वाचा -

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणार

जगात सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा