Advertisement

जगात सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी

जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावं ‘क्यू एस रँकिंग’नं प्रकाशित केली आहेत. या क्रमवारीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईनं क्रमवारीत हे स्थान पटकाविलं आहे.

जगात सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी
SHARES

देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम असल्याचं ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेनं जाहीर केलं आहे. जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावं ‘क्यू एस रँकिंग’नं प्रकाशित केली आहेत. या क्रमवारीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी आहे. सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईनं क्रमवारीत हे स्थान पटकाविलं आहे.

मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम स्थानी

जगातील एक हजार विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ही दोन्ही विद्यापीठं जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असून आशियात सर्वोत्तम क्रमवारीत आहेत. त्याशिवाय, आयआयटी मुंबईनंतर १५२ व्या स्थानी असून, आयआयटी दिल्ली १८२व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ १८४व्या स्थानी आहे. २३ भारतीय संस्थांपैकी  संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे.

स्थान पक्क

आयआयटी मुंबईचं स्थान संशोधनामुळं वाढलं आहे. निव्वळ प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित राहणाऱ्या संशोधनाचा विचार या क्रमवारीत केला जात नाही नसून, ज्या संशोधनानं अर्थकारणाला आणि जीवनमान उंचावण्याला चालना मिळते त्या संशोधनाचा विचार केला जातो. त्यानुसार, आयआयटी मुंबईतील संशोधनाच्या उपयुक्ततेची पातळी ही जागतिक किमान दर्जापातळीपेक्षा अधिक असल्यानं त्यांचं स्थान पक्कं राहिलं आहे.



हेही वाचा -

उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग?

'ईव्हीएमचा वापर बंद करा, नाही तर महाराष्ट्र बंद करू', वंचित बहुजन आघाडीचा इशारा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा