मुंबईत इडीची छापेमारी, महाराष्ट्रातील नेता रडारवर?

शिवसेनेचे नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेण्याआधी ही छापेमारी केली जात असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईत इडीची छापेमारी, महाराष्ट्रातील नेता रडारवर?
SHARES

मुंबईत ईडीकडून (ED Raids in Mumbai) विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (gangster Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ईडीची दिल्लीतील टीम मुंबईत दाखल झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचं महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा संपत्तींची चौकशी ईडीच्या टीम्सकडून सुरू आहे. दक्षिण मुंबई परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, १९९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

तसंच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे याबाबतही कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.

शिवसेनेचे नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेण्याआधी ही छापेमारी केली जात असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांबाबत गौप्यस्फोट करण्यासाठी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे.



हेही वाचा

शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, रेकी झाल्याचं उघड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा