राहतवर आफत! परकीय चलनाच्या तस्करीप्रकरणी ईडीनं बजावली नोटीस


राहतवर आफत! परकीय चलनाच्या तस्करीप्रकरणी ईडीनं बजावली नोटीस
SHARES

परकीय चलन भारताबाहेर नेल्याप्रकरणी पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान याला सक्तवसुली संचालनालया (ईडी)ने नोटीस बजावली आहे. फाॅरेन एक्स्चेंज मॅनेजमेन्ट अॅक्ट अर्थात फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हणत ईडीनं राहत फतेह अली खानला दणका दिला आहे.


तस्करीचा संशय

राहत फतेह अली खान २००९ पासून भारतात काम करत अाहे. यादरम्यान त्याला बाॅलिवूडमध्ये चांगली संधी मिळत गेली, मोठ्या संख्येनं गाणी मिळाली. त्यातच तो परकीय चलनही आपल्या गायनाच्या माध्मयातून कमवत होता. मात्र या कामातून मिळणार्या पैशाची कोणतीही माहिती वा हिशोब त्यानं आयकर विभागाला दिलेला नाही. अशातच २०११ मध्ये राहत फतेह अली खान यांना दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३,४०,००० डाॅलर बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. हे पैसे कुठून आणि कसे आले याची कोणतीही माहिती वा कागदपत्र त्यावेळी त्यांना सादर करता आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी राहत फतेह अली खानच्या मॅनेजरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान राहत फतेह अली खाननं २,२५,००० डॉलरची तस्करी केल्याचा संशय पोलिसांना होता.


३०० टक्के दंड

त्यानुसार ईडीनं आता राहत फतेह अली खानला नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर या पैशांबाबत समाधान उत्तर दिली नाही तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. फेमा कायद्यानुसार कारवाई झाल्यास एकूण रक्कमेच्या ३०० टक्के दंड त्याला भरावा लागणार आहे. तर हा दंड न भरल्यास त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करत त्याच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अशी कारवाई झाल्यास भविष्यात त्यांना भारतात शो वा इतर कोणतेही कार्यक्रम करता येणार नाही. त्यामुळे आता राहतवर आफत आल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा -

पुजारीच्या हस्तकांना दणका, मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा

नवघरमध्ये आढळला अर्धवट जाळालेला मृतदेह, परिसरात खळबळ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा