पुजारीच्या हस्तकांना दणका, मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा

पुजारीचे हस्तक असलेल्या विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स आणि आकाश शेट्टी यांनी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. या दोघांची अटक पुजारी टोळीसाठी दणका मानला जात असतानाच पोलिसांनी पुजारी टोळीला-त्याच्या हस्तकाला आता आणखी एक मोठा दणका दिला आहे. तो म्हणजे या दोघांविरोधात पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुजारीच्या हस्तकांना दणका, मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा
SHARES

गोरेगावमधील बांधकाम व्यावसायिकाला दूरध्वनीवरून खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीतील दोन हस्तकांच्या मुसक्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी आवळल्या आहेत. पुजारीचे हस्तक असलेल्या विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स आणि आकाश शेट्टी यांनी पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. या दोघांची अटक पुजारी टोळीसाठी दणका मानला जात असतानाच पोलिसांनी पुजारी टोळीला-त्याच्या हस्तकाला आता आणखी एक मोठा दणका दिला आहे. तो म्हणजे या दोघांविरोधात पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खंडणीविरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून नव्या वर्षातील, २०१९ मधील मोक्काखालील हा पहिला गुन्हा ठरला आहे.


खंडणीची मागणी धुडकाली

गोरेगावमधील एका बांधकाम व्यावसायिकाला पुजारीकडून खंडणीसाठी धमकावलं जात होतं. पण या व्यावसायिकानं या धमक्यांना भीक न घालता खंडणीची मागणी धुडकावून लावली. त्यानंतर पुजारीच्या हस्तकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरूवात केली. हे प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्यानं शेवटी बांधकाम व्यावसायिकानं पोलिसांत धाव घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स आणि पुजारी टोळीचा मुंबईतील प्रमुख आकाश शेट्टी याला अटक केली.


दोघेही अट्टल गुन्हेगार

अटक करण्यात आलेले दोघेही अट्टल गुन्हेगार असून राॅड्रिक्सविरोधात याआधीच पोलिसांकडून त्याला तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातच तो या खंडणीच्या गुन्ह्यातही अडकला आहे. त्यामुळे त्याच्या गळ्याभोवतालचा फास आवळला असतानाच मोक्का लावत पोलिसांनी हा फास आणखी घट्ट केला आहे. विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्ससह आकाश शेट्टी या दोघांविरोधात मोक्कांतर्गत गुन्हे दाखल करण्यता आले आहेत.



हेही वाचा -

भुज एक्सप्रेसमधील महिलेची हत्या केली तरी कुणी? अटक करण्यात आलेला आरोपी निर्दोष!

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ६ सेगवे वाहने दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा