एकनाथ खडसे यांना EDची नोटीस


एकनाथ खडसे यांना EDची नोटीस
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना EDकडून नोटीस पाठवण्यात आल्याने राजकारण पून्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडसे यांना ED कडून ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आली असल्याचे समजते. ईडी नोटीसबाबत 'कदाचित सुट्टी असल्यामुळे मला अद्याप ईडीकडून नोटीस मिळालेली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाः- लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती

भाजपला रामराम ठोकत काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. मात्र त्यावेळीच त्यांनी ED कडून माझीही भविष्यात चौकशी होऊ शकते असे भाकीत केले होते. तसंच त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशाराही दिला होता. त्यामुळे आता अखेर एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर ते कुठली  सीडी लावतात का आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचाः- मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या अ‍ॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड

यापूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, राज ठाकरे यांनाही ईडीकडून नोटीस आली होती. शरद पवार यांनी आक्रमकपणे ईडी चौकशीचा सामना करत निवडणुकीपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला जातो, असा आरोप विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. त्यातच आता एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरू झाल्याने आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा