Advertisement

मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या अ‍ॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यावरुन प्रचंड आक्रमक झाली आहे.

मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या अ‍ॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड
SHARES

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यावरुन प्रचंड आक्रमक झाली आहे. पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. चांदिवली इथल्या अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

मुंबईआधी पुण्यातील अ‍ॅमेझॉनचे कार्यालय फोडण्यात आले होते. मनसे कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड सुरू असताना पुणे पोलिसांकडून अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. दरम्यान, कंपनीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आली नाही.

अ‍ॅमेझॉननं मनसेच्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात कोर्टात धाव घेतली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना कोर्टानं ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

राज ठाकरेंना कोर्टानं नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्र म्हणाले की, अॅमेझॉनला यायी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्रात अॅमेझॉनला मराठी भाषा मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात अॅमेझॉन मान्य नाही.



हेही वाचा

टीका करणं एवढेच मनसेचं काम- अनिल परब

राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा