Advertisement

राज ठाकरेंना नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिंडोशी कोर्टानं नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.

राज ठाकरेंना नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिंडोशी कोर्टानं नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ॲमेझॉनला येत्या काळात नक्कीच याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी दिला.

ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेनं घेतली आहे.

मराठी भाषेवरुन सुरू केलेल्या मोहिमेवरुन अ‍ॅमेझॉननं कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत.

“अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीनं एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे” असा इशारा अखिल चित्रे यांनी दिला.

ॲमेझॉन ॲप आतापर्यंत हजारो लोकांनी अनइन्स्टॉल केलेला आहे, अद्यापही ती प्रक्रिया सुरू आहे. जर अ‍ॅमेझॉन येत्या काळात लवकर वठणीवर आला नाही, तर महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय ठप्प होणार हे शंभर टक्के गृहीत धरावं, असंही मनसेने बजावलं.

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत.



हेही वाचा

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? रात्रीच्या संचारबंदीवरून मनसेची टीका

महाराष्ट्राने २५ कंपन्यांशी केले ६१ हजार कोटी रुपयांचे करार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा