Advertisement

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? रात्रीच्या संचारबंदीवरून मनसेची टीका

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.

कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? रात्रीच्या संचारबंदीवरून मनसेची टीका
SHARES

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रात्रीच्या संचारबंदीवर मनसेनं टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी 'करो'ना, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

“मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे विचारले आहेत.

“तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला. व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचे नाही, हे कोणते लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला.

“लॉकडाउनमुळे यावर्षी लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर मग अमेरिकेसारखे पॅकेजही द्या” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.हेही वाचा

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरु – एकनाथ शिंदे

महाराष्ट्राने २५ कंपन्यांशी केले ६१ हजार कोटी रुपयांचे करार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा