Advertisement

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरु – एकनाथ शिंदे

शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणं सोपं होईल.

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरु – एकनाथ शिंदे
SHARES

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचं काम सुरु असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणं सोपं होईल. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन सध्या अनुकूलता दाखवत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचं काम सुरु आहे.

कांजूरमार्गची ४० हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो ३, ४ आणि ६ या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार असल्याचंही ते म्हणाले.



हेही वाचा-

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा