अनिल देशमुख यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावी अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळली.

अनिल देशमुख यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स
SHARES

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स पाठवण्यात आलं आहे. बुधवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीने आदेश दिले आहेत. अनिल देशमुख आता तरी चौकशीला हजर राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.  

ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावी अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळली. त्यानंतर आता मंगळवारी ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. याआधी अनिल देशमुख यांना चार वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. आता पाचव्यांदा समन्स बजावल्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला. ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने अनिल देखमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा