दाऊदचा राईट हॅड इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर टाच

हॉटेल, टॉकीज, बंगला, जमीन, बँक खात्यातील रक्कम अशा मालमत्ताच समावेश आहे. या मालमत्ता मुंबई व पाचगणी येथील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दाऊदचा राईट हॅड इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेवर टाच
SHARES

दाऊदनंतर मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने आता त्यांच्या सर्वात जवळच्या हस्तकाच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. दाऊदचा अत्यंत विश्वासू साथीदार इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधीत सुमारे २३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) टाच आणली आहे. त्यात हॉटेल, टॉकीज, बंगला, जमीन, बँक खात्यातील रक्कम अशा मालमत्ताच समावेश आहे. या मालमत्ता मुंबई व पाचगणी येथील असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचाः-तर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग

दाऊदचा विश्‍वासू असलेल्या मिर्चीला १९९४ मध्ये तडीपार केलेहोते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा व्यवसाय तोसांभाळत असे. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने देखील नोटीस जारी केली होती. १९९५ साली तो भारतातूनविदेशात पळून गेला. १९८८ पासून अंमली पदार्थांच्यातस्करीप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा आहे. भायखळायेथे मिरचीच्या कुटुंबियांचा मिरची विकण्याचा व्यवसायहोता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात मिर्ची हे टोपणनाव मिळाले. अंमली पदार्थांच्या प्रामुख्यानेमॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीत तो कुप्रसिद्ध आहे.भारतातून परागंदा झाल्यानंतर मिरचीने दुबईत आपलेसाम्राज्य निर्माण केले.१४ ऑगस्ट,२०१३ मध्ये मिर्चीचा लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यामुळे मृत्यू झाला होता. मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ व जुनैद यांच्यासह १३ जणांवर ईडीने डिसेंबर, २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीने बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यानंतर ही मालमत्ता पुनर्विकासासाठी विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात मिर्चीने बेकायदा खरेदी केलेल्या मालमत्तेचा लाभ त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याचा आरोप आहे. ते या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी अनेकवेळा मिर्चीच्या कुटुंबियांना समन्स पाठवले होते. पण त्यानंतर ते हजर न झाल्यामुळे अखेर ईडीने मार्च महिन्यात मिर्ची कुटुंबियांविरोधात अजामिनपात्र वॉरट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. नुकतीच ईडीची ती मागणी न्यायालयाने मान्य केली होती. 

हेही वाचाः- खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी

भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये २५ मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील १६ मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत.याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी ५०० कोटींची मालमत्ता आहे. तर मुंबईमधील न्यू रोशन चित्रपटगृह, मुंबईतील हॉटेल, आणखी एक बांधकाम सुरु असलेल हॉटेल, पाचगणी येथील साडेतीन एकर जमीन, फार्म हाऊस, दोन बंगले व बँकेतील रक्कम अशी २२ कोटी ४२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. साफेमा या केंद्रीय यंत्रणेद्वारे  मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही १० नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये ५०१ व ५०२ हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १२०० चौ.फुट आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा