अंबरनाथमध्ये चोरांनी अंड्यांनी भरलेला ट्रक पळवला


अंबरनाथमध्ये चोरांनी अंड्यांनी भरलेला ट्रक पळवला
SHARES

अंबरनाथमध्ये कारमधून आलेल्या चोरट्यांनी अंड्याचा ट्रक चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मध्यरात्री ३.१५ च्या सुमारास ही घटना घडली असून चोरांनी पाच लाखांच्या अंड्यांसह ट्रक चोरी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  


पैसे, मोबाइल हिसकावला

अंबरनाथमधील महाराष्ट्र एग्ज सेंटरमध्ये अंडी पोहचवण्यासाठी कर्नाटकच्या बिदर येथून अंड्यांनी भरलेला ट्रक निघाला होता. या ट्रकमध्ये ५ लाख रुपयांची १ लाख ४१ हजार अंडी होती. मात्र, चोरांनी कारमधून येऊन या ट्रकला अंबरनाच्या टी सर्कलजवळ अडवले. त्यांनी ट्रकचालक मोहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा मुजम्मिल या दोघांना जबरदस्तीनं ट्रकमधून उतरवले आणि गाडीत बसवले. चोरांनी दोघांच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि टिटवाळाजवळील रायता जंगलात सोडलं. चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेले पैसे आणि मोबाईलही हिसकावला. 



हेही वाचा - 

बनावट जन्म दाखला बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबईत कुत्रेही सुरक्षीत नाहीत, ४ गर्दुल्ल्यांनी केला गँगरेप?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा