तात्काळ सेवा काय कामाची?


तात्काळ सेवा काय कामाची?
SHARES

दादर हे मुंबईतील गर्दीचे रेल्वे स्थानक मानले जाते. त्यामुळे सेंट्रल वेस्टर्नच्या सर्वच प्रवाशांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. अशातच एखादा अपघात झाल्यानंतर तात्काळ सेवा उपलब्ध नसते. अशा वेळी अपघाती प्रवाशाला प्राण गमवावे लागतात.

असाच प्रसंग दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर पाहायला मिळाला. दुपारी 2 च्या दरम्यान दादर स्थानकावरून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या लोकलमधून इंद्रकुमार फडणीस वय वर्ष 67 हे खाली पडले. फडणीस हे खाली पडण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेन मध्ये त्याच वेळी एका इसमाने त्यांचा मोबाईल चोरी करून त्यांना ट्रेन मधून खाली ढकलून दिले.

या ठिकाणी उभे असलेल्या आकीब शेख आणि जय विश्वकर्मा या 2 तरुणांनी अपघातग्रस्त फडणीस यांना पाणी आणि प्रथमोपचार दिले. यावेळी रेल्वे स्थानकात कोणतीही तात्काळ औषध उपचार सेवा उपलब्ध नव्हती. उपस्थित दादर स्टेशनचे डेप्युटी मॅनेजर यांनी 108 या तात्काळ सेवा नंबरवर कॉल करायचा प्रयत्न केला असता आम्ही लवकरच काही सोय करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. बराच वेळ ही सोय उपलब्ध न झाल्यामुळे डेप्युटी मॅनेजर यांनी प्रायव्हेट टॅक्सी करून अपघातग्रस्त व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केले.

परंतु मुळात 108 ही तात्काळ सेवा रेल्वेसाठी असून देखील या ठिकाणी डॉक्टर, ड्राईव्हर उपस्थित नसणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. दरम्यान, रेल्वेमध्ये वारंवार होण्याऱ्या या चोऱ्यांवर आळा बसणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आकीब शेख यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा