‘व्हेल शार्क’ मासा पकडल्या प्रकरणी तिघांना अटक

हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा वाढतो. असे असतानाही, महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या ससून डाॅकवर गेल्या आठवड्यात बुधवारी मृत 'व्हेल शार्क' मासा पकडून आणला होता.

‘व्हेल शार्क’ मासा पकडल्या प्रकरणी तिघांना अटक
SHARES

मुंबईच्या ससून डाॅक परिसरात काही मच्छीमारांनी गेल्या आठवड्यात महाकाय वेल मासा पकडून आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदवला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आल्याचे कळते. समुद्रात मासेमारी बंद असताना. या मच्छीमारी बंद असतानाही, या  मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी बोट पाण्यात उतरवल्याने वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 हेही वाचाः- स्थगितीनंतरही आरेत काम सुरू, प्रजापूर पाड्यातील रहिवाशांचा दावा

महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार मासळीच्या साठ्याचे जतन  करण्याच्या हेतूने शासनाने हा कालावधी मासेमारीसाठी बंद ठेवला जातो. हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा वाढतो. असे असतानाही, महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या ससून डाॅकवर गेल्या आठवड्यात बुधवारी मृत 'व्हेल शार्क' मासा आढळून आला होता. हा मासा बंदरावर आणल्यानंतर त्याच्या विक्रीचा व्यवहार पार पडला. त्यानंतर व्यापाराकडून या माशाला कापण्यात आले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'मध्ये व्हेल शार्क मासा संरक्षित आहे. त्यामुळे त्याची मासेमारी किंवा व्यापार करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत हा मासा डाॅकवर आणून त्याचा व्यापार झाल्याने या प्रकरणी 'कांदळवन कक्षा'च्या अधिकाऱ्यांनी दोघा जणांना अटक केली होती. सोमवारी या प्रकरणात अजून तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये व्हेल शार्क बंदरावर वाहून आणलेल्या बोटीचा मालक, तांडेल आणि या माशाचा लिलाव करण्यासाठी त्याला खरेदी केलेल्या व्यापाराचा समावेश आहे.

हेही वाचाः-मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ड्रोनची नजर, गुन्हेगारीला बसणार चाप

व्हेल शार्कची मासेमारी केलेली बोट ही पनवेलमधील केळवणे गावातील असून या बोटीचा दोन मालकांना अटक केल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'च्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हा मासा लिलावाकरिता विकत घेतलेला एका व्यापाराला ससून डाॅकमध्ये सापळा रचून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. या तिघांवर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी मच्छीमारांचा परवाना रद्द करण्याबरोबर बोट ताब्यात घेण्याची कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाकडून होऊ शकते, अशी माहिती विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा