रसिकालाल ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

भिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचं सोनं देण्याचं आश्वासन दुकान मालक शहा यांनी दिलं गेलं. त्यानुसार, बहुसंख्य लोकांनी दुकान शहा यांच्याकडं लाखो रुपये गुंतवले.

रसिकालाल ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात दोघांना अटक
SHARES
ग्राहकांना गुडविन ज्वेलर्सनं मोठा गंडा घातल्याचं उदाहरण ताजे असताना, काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सनं ग्राहक आणि गुंतवणूकदरांची 300 कोटींना फसवणूक केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जयेश रसिकलाल शहा (55),  रसिकलाल शहा (53) अशी या दोघांची नावे आहेत.


सोनं देण्याचं आश्वासन

भिशीच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आणि वर्षभरानंतर तेवढ्याच पैशांचं सोनं देण्याचं आश्वासन दुकान मालक शहा यांनी दिलं गेलं. त्यानुसार, बहुसंख्य लोकांनी दुकान शहा यांच्याकडं लाखो रुपये गुंतवले. मिळालेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सचं दुकान बंद होतं. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरुन हे दुकान बंद करून ज्वेलर्स फरार असल्याची माहिती व्हायरल होऊ लागली. ज्या लोकांनी इथं गुंतवणूक केली होती आणि जे लोक आसपास राहत होते ते त्याच दिवशी आपले पैसे घेण्यास ज्वेलर्सच्या दुकानात पोहचले. त्यानंतर उपस्थित गुंतवणूकदारांना ज्वेलर्सकडून गुंतवणुकीच्या बदल्यात सोनं वाटण्यात आलं.

ग्राहकांची मदत

घाटकोपरचे भाजपचे आमदार पराग शहा यांनी यामध्ये ग्राहकांची मदत केली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, ‘ग्राहकांची वाढती गर्दी पाहता ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी दागिन्यांचे दुकान पुन्हा बंद झाले, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. दुकानाबाहेर मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली होती. शेवटी मालकानं इतर गुंतवणूक दारांनाही सोनं देण्याचं मान्य केलं.

पोंझी योजना

रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स बेकायदेशीरपणे पोंझी योजना चालवत होते. काही गुंतवणूकदारांना दागिने मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) संपर्क साधला आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार दाखल केली. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी शहा बंधुना अटक केली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा