मढमधल्या मच्छीमाराचा मृत्यू

 Madh Island
मढमधल्या मच्छीमाराचा मृत्यू

मालाड - मढ जेट्टी परिसरात दारू पिण्यामुळे एका मच्छीमाराचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेला व्यक्ति हा उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर येथील राहणारा होता. मुंबईत तो मासेमारी करण्यासाठी येत असे. शुक्रवारी तो आणि त्याचा सहकारी मासेमारी करण्यास मढ जेट्टी येथे गेले होते. या वेळी बोटीतच दारू पिऊन दोघे झोपले. सकाळी दोघांपैकी एकाची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोघेही खूप दारू प्यायले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटंगरे यांनी दिली.

Loading Comments