प्रतीक्षानगरमध्ये खंडणीसाठी मारहाण केलेल्या दोघांना अटक

 Mumbai
प्रतीक्षानगरमध्ये खंडणीसाठी मारहाण केलेल्या दोघांना अटक
प्रतीक्षानगरमध्ये खंडणीसाठी मारहाण केलेल्या दोघांना अटक
See all

प्रतीक्षानगर - खंडणीसाठी सोनाराला मारहाण करणाऱ्या त्रिकुटाला वडाळा टीटी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पकडले आहे. त्यागराज उर्फ (त्यागी) आणि अरविंद अशी त्यांची नावे असून तिसऱ्या अज्ञात आरोपीचा या घटनेशी कुठलाच संबंध नसल्याने त्याची सुटका करण्यात आली आहे.

खंडणीसाठी सोनाराला मारहाण झाल्याची घटना प्रतीक्षानगरमध्ये रविवारी रात्री घडली होती. त्यानुसार वडाळा टीटी पोलीस या त्रिकुटाचा शोध घेत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल कांबळे यांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने घटनेतील मुख्य आरोपी त्यागराजच्या घरावर 10 जानेवारीला छापा टाकत चौकशीसाठी त्याच्या आईला आणि मित्रांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मुख्य आरोपी त्यागी सांताक्रूझला असल्याचे समजले. दरम्यान पोलीस मागावर असल्याचा संशय आरोपीला आल्यानंतर त्याने वांद्र्याकडे पळ काढला. पण अखेर पोलिसांनी सापळा रचत चेंबूरच्या कामत हॉटेलजवळून त्यांना अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता दुसरा आरोपी अरविंदला सायनच्या सिनेमॅक्स थिएटर जवळून तर तिसरा अल्पवयीन मुलाला त्याच्या घरातून अटक केली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

Loading Comments