पोलिसांची आयडियाची कल्पना !

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वारंवार होणार अपघात, वाहतूक कोंडी, बेदरकारप्रमाणे गाडी चालवणारे प्रवासी या सर्वांवर आता पोलिसांची बारीक नजर असणाराय. त्यामुळे हायवेवर आता जरा संभाळूनच गाडी चालवा. कारण साध्या वेशातले पोलीस तुमच्या आजू-बाजूलाच असणार आहेत. साध्या वेशात हायवे पोलीस एक्स्प्रेस वे वर गस्त घालणार आहेत.

सुसाट वाहन चालकांवर लक्ष ठेवण्याकरता पोलिसांचं पथक पनवेल ते उर्से या मार्गावर सतत गस्त घालणार आहे. या योजनेंतर्गत गेल्या सहा दिवसात 1 हजार 992 जणांवर कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे आता एक्स्प्रेस वे वर नियम मोडणा-यांना चाप लागणार हे नक्की.

Loading Comments