पोलिस असल्याचे सांगून फसवणूक, तोतया आरोपी अटकेत


पोलिस असल्याचे सांगून फसवणूक, तोतया आरोपी अटकेत
SHARES

मुंबईत पोलिस असल्याचे सांगून तसेच पुढे एकाची हत्या झाली असून सोनं सुखरूप ठेवण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्यांच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढ होत आहे. विलेपार्लेत अशाच एका वृद्ध महिलेची फसवणूक करू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जाफर अली सय्यद असे या आरोपीचे नाव आहे.  

हेही वाचाः- राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर

रस्त्यात चालणारी एकटी महिला किंवा वृद्ध नागरिकाला गाठायचे. पोलिस असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने, पैसे काढण्यास सांगून हातचलाखी करून पसार व्हायचे. हाच यांचा गोरख धंदा...मागील अनेक दिवसांपासून मुंबईत अशा भूरट्या चोरांच्या संख्येत वाढ झाली आहे. विलेपार्ले येथे राहणाऱ्या लक्ष्मी मंदा या सकाळी घराबाहेर पडल्या असता दोघांनी त्यांना रोखले. पोलिस असल्याचे सांगून अंगावरील दागिने काढून बांधून ठेवण्यास सांगितले. यादरम्यान हातचलाखी करून लक्ष्मी यांचे मंगळसूत्र घेऊन पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विलेपार्ले पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलका मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या पथकाने सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. आरोपीचा माग काढला असता. तो खारघर परिसरात लपून बसला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी  सय्यद याला शोधून काढले तर त्याचा साथीदार फरार आहे. तपासामध्ये सय्यदवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह गुजरातमध्येही २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा