‘या’ शिवसेना खासदाराच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून फसवणूक

समाज माध्यमांवरही त्यांनी संदेश पाठवून आपल्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. संबंधीत व्यक्ती अनेकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत आहे, तसेच खासगी संदेश पाठवून पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे कृपया अशा कोणतीही फ्रेन्ड रेक्वेस्ट स्वीकारू नका

‘या’ शिवसेना खासदाराच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून फसवणूक
SHARES

कोरोनामुळे नागरिक घरी बसले आणि इंटरनेटचा वापरही वाढल्याचे पहायला मिळाले. हिच संधी साधून सायबर चोरट्यांनी याचे नाव आणि त्याचा फोटो अशी बनावट खाती उघडून त्यांच्यात मित्रांना गंडवण्याचा गोरख धंदा सुरू केला. आतापर्यंत सर्व सामान्यांच्या नावाचा किंवा फोटोचा वापर हे चोरटे करत होते. मात्र आतातर त्यांनी हद्दच ओलांडली.  चोरट्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बनावट खाते सुरू करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खासदार अरविंद सावंत यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचाः- आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीने दिली बदनामी कऱण्याची धमकी

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे दक्षिण मुंबई मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने खोटे अकाऊंट तयार करुन त्याद्वारे पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती अरविंद सावंत यांना मिळाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंत यांनी स्वतः नागरीकांना या फसवणूकीपासून जागरुक करण्यासाठी संदेश पाठवले आहेत. तसेच समाज माध्यमांवरही त्यांनी संदेश पाठवून आपल्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. संबंधीत व्यक्ती अनेकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवत आहे, तसेच खासगी संदेश पाठवून पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे कृपया अशा कोणतीही फ्रेन्ड रेक्वेस्ट स्वीकारू नका, तसेच पैसे देऊ नका, अशी विनंत सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबत सावंत यांच्या जवळच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा देत याप्रकरणी सायबर पोलिस तपास करत असल्याचे सांगितले.

हेही वाचाः- फेसबुकवरील मैत्री पडली महागात, मद्य पाजून तरुणीवर अत्याचार

सावंत यांना रविवारी त्यांच्या मित्राला दूरध्वनी आला. त्यानंतर त्यांना या प्रकाराबाबतची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सर्व समाज माध्यमांवर संदेश पाठवून नागरीकांना सतर्क केले. पोलिस सूत्रांनी ही वृत्ताला दुजोरा देत आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले. यापूर्वीहीअशाच पद्धतीने अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींच्या नावाने बनावट खाते तयार करून पैसे मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर वावरत असताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

संबंधित विषय