बळीराजाला मंत्रालयात मारहाण, कृषीमंत्र्यांची सारवासारव

Mumbai  -  

मुंबई - औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातून आलेल्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी मंत्रालयात मारहाण केलीय. रामेश्वर भुसारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. भुसारे हे 2015 साली गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मागायला आले होते. भुसारे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटायचे होते.

पण, कोणत्याही विभागाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी 6 व्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर ठिय्या केले. त्यानंतर पोलिसांनी भुसारे यांना ताब्यात घेतलं आणि मारहाण करायला सुरूवात केली. तर, त्यांच्या कपड्यांवर रक्ताच्या डागावरुन तसंच ओठांवरील जखमेवरुन स्पष्ट होते की त्यांना मारहाण करण्यात आलीय. तर पोलिसांनी त्यांना मारहाण केली नाही, बाचाबाचीत त्यांना लागले आहे असा दावा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे. 

तसंच रामेश्वर भुसारे यांनी माझीही भेट काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यांना बँकेतून कर्ज हवं आहे.  त्यांच्यासाठी सबसिडी देण्याचे आश्वासनही दिले होते, असंही पांडुरंग फुंडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Loading Comments