बापाने केली मुलीची हत्या, 'हे' आहे कारण

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रविवारी सकाळी प्रवासी रिक्षामध्ये बॅग सोडून पळून गेला होता. बॅगेमधून दुर्गंधी येत असल्याने रिक्षा चालकाने पोलिसांना माहिती दिली.

बापाने केली मुलीची हत्या, 'हे' आहे कारण
SHARES

बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. अरविंद तिवारी (४७) असे आरोपीचे नाव आहे. ते टिटवाळा येथे राहतात.  मुलीचे दुसऱ्या एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधांना वडिलांचा विरोध होता. मात्र, मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे तिवारी यांनी मुलीची हत्या केली. 

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रविवारी सकाळी प्रवासी रिक्षामध्ये बॅग सोडून पळून गेला होता. बॅगेमधून दुर्गंधी येत असल्याने रिक्षा चालकाने पोलिसांना माहिती दिली. बॅगेमध्ये महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला होता. कल्याण पोलिसांनी या गुन्ह्याची शोध लावला होता. तपासात वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

अरविंद तिवारी यांनी हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुकडे बॅगेमध्ये भरुन रिक्षाने चालले होते. पण बॅग रिक्षामध्येच सोडून त्यांनी पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला शोधले. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ आरोपीने रिक्षा सोडली त्या ठिकाणचे आणि टिटवाळा रेल्वे स्थानकातील सूटकेससह ट्रेनमध्ये चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.हेही वाचा -

कुर्लामध्ये साप चावल्याने पोलिसाचा मृत्यू

आता मुंबई पोलिस घालणार घोड्यावरून गस्त
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा