तीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या


तीन मुलींना मारून पित्याची आत्महत्या
SHARES

साकीनाका - साकीनाका परिसरातलं मरोळ पाइपलाइन गाव सकाळीच हादरलं ते एक भयंकर घटना उघडकीस आल्यानं. एका पित्यानं आपल्या तीन मुलींना विष देऊन स्वत:ही आत्महत्या केली. शनिवारी सकाळी आठ-साडे आठच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. मंगेश आणेराव (४८) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आणेराव यांनी सव्वा वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि एक चार वर्षाच्या मुलीला विष देऊन ठार मारलं आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केली. आणेराव यांनी सात वर्षाच्या मुलाला पत्नीसोबत माहेरी पाठवलं होतं. त्यांचे भावाशी मालमत्तेवरून वाद सुरू होते. तसंच मंगेशचे पत्नीशीही वाद होत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी मंगेशचे वडील आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय