तुम्हाला, पाणीपुरी आवडते? मग हे वाचाच!

मुंबईकरांनो, यापुढे फक्त ठेल्यावरचीच नाही, तर चांगल्या रेस्टाॅरंटमध्येही पाणीपुरी खाताना काळजी घ्या. कारण अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने भेसळयुक्त तेल वापरून अत्यंत गलिच्छ ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या कारखान्यावर नुकतीच धाड मारली आहे. या धाडीत जे काही दृष्य दिसलं, ते बघून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल.

तुम्हाला, पाणीपुरी आवडते? मग हे वाचाच!
SHARES

चटपटीत काही खावसं वाटलं की अनेकांचे पाय आपोआप वळतात ते जवळच्याच एखाद्या पाणीपुरीच्या ठेल्याकडे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडणारी असल्याने पाणीपुरीवर मनसोक्त ताव मारणाऱ्यांची मुंबईत कमी नाही. पण मुंबईकरांनो, यापुढे फक्त ठेल्यावरचीच नाही, तर चांगल्या रेस्टाॅरंटमध्येही पाणीपुरी खाताना काळजी घ्या. कारण अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने भेसळयुक्त तेल वापरून अत्यंत गलिच्छ ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या कारखान्यावर नुकतीच धाड मारली आहे. या धाडीत जे काही दृष्य दिसलं, ते बघून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल.



अस्वच्छ जागा, निकृष्ट माल

एफडीएच्या बृहन्मुंबई (अन्न) विभागानं नुकताच दहिसर पश्चिमेकडील साईबाब नगर येथील मे. ओमसाई फूड्सच्या कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करण्याचं काम सुरू होतं. पण ज्या ठिकाणी हे काम सुरू होतं त्या ठिकाणी प्रचंड घाण, अस्वच्छता होती. त्यातच पाणीपुरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पिठ, तेल आणि इतर कच्चा माल निकृष्ट दर्जाचा होता. पुऱ्या तयार करण्याची पद्धतही अस्वच्छ असल्याचं यावेळी दिसून आल्याची माहिती शैलश आढाव, सहआयुक्त, बृन्हमुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.




ग्राहकांच्या जीवाशी खेळ

ज्या डब्यामधील तेल पाणीपुरी तयार करण्यासाठी वापरलं जात होतं ते डबे कळकट्ट, मळकट्ट होतेचं; पण त्यातील तेलही खराब, भेसळयुक्त असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एफडीएची नोंदणी न करताच आणि परवानगी न घेताच इथं पुऱ्या तयार केल्या जात होत्या. अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन करत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मे. ओमसाई फूड्सविरोधात एफडीएनं गुन्हा नोंदवला.



किती माल जप्त

एफडीएनं या कारखान्यातून ३४ हजार ८०० रुपयांच्या ६९६ किलो पुऱ्या, २३०० रुपये किंमतीची ४६ किलो शेव, पुऱ्या तळण्यासाठी लागणारं १९ हजार ७२ रुपये किंमतीचं २३८ किलो पामोलीन तेल असा एकूण ५६ हजार १७२ रुपयांचा माल जप्त केला आहे.


रेस्टाॅरंटमध्येही पुरवठा

तर मे. ओमसाई फूड्सला स्टाॅप बिझनेसची नोटीस देत त्यांच शटर डाऊन करण्यात आलं आहे. या छाप्यातून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बाब पुढे आली आहे ती म्हणजे या पुऱ्या रस्त्यावरील स्टाॅल, ठेल्यासाठीच नव्हे, तर मोठाल्या रेस्टाॅरन्ट आणि स्टाॅलमध्ये विक्रीसाठी पाठवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण अशी पाणीपुरी खाणं शरिरास नक्कीच अपायकारक ठरू शकतं.



हेही वाचा-

तुम्ही घाण पाण्याची आईस्क्रिम तर खात नाहीय ना?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा