महिला ड्रग्ज तस्कराला मानखुर्दमधून अटक


महिला ड्रग्ज तस्कराला मानखुर्दमधून अटक
SHARES

मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळ्यात पोलिसांना यश आलं असतानाच आता या क्षेत्रात महिलांचाही वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्जची म्हणजेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला मानखुर्द येथून अटक केली आहे. अमिना हमजा शेख उर्फ लाली (४९) असं या महिलेचं नाव आहे. लालीवर यापूर्वीही घाटकोपर आणि वरळी युनिटमध्ये अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. 


अमिना पोलिसांच्या अटकेत

मानुखर्दच्या भारतीय इंदीरा एकता को. ऑप. सोसायटीत रहात असलेल्या अमिना अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची महिती वरळी यूनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत अमिनाला अटक केली. पोलिसांनी अमिनाच्या घराची झडती घेतली असता तिच्याजवळ २५ ग्रॅम हिरॉईन सापडलं. बाजारात त्याची किंमत अडिच लाख इतकी आहे. यापूर्वीही पोलिसांच्या घाटकोपर आणि वरळी युनिटने अमिनावर एनडीपीआरएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवला होता. अमिनाला अंमली पदार्थ कोण पुरवतं याचा शोध सध्या पोलिस घेत आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा