चित्रपट निर्मात्याने दिली पत्नीला कारने धडक, गुन्हा दाखल

मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट निर्मात्याने दिली पत्नीला कारने धडक, गुन्हा दाखल
SHARES

चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. त्याच्याविरुद्ध मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मात्याच्या पत्नीने आरोप केला आहे की, कमल किशोरने तिला गाडीने उडवून मारण्याचा प्रयत्न केला. सध्या किशोरमिश्रा फरार आहे.

निर्माता कमल किशोर मिश्रा यांनी पत्नीला कारने उडवण्याचा प्रयत्न केला. कार अंगावर घातली असा आरोप तिने केला आहे. या घटनेनंतर निर्माता कमल किशोर मिश्रा यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आंबोली पोलिसांनी कमलकिशोर मिश्राविरुद्ध भादंवि कलम २७९ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, 19 ऑक्टोबर रोजी जेव्हा ती पती कमल किशोर मिश्रा यांच्या घरी गेली तेव्हा तिने त्यांना कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसलेले पाहिले. त्या महिलेसोबत ते कारमध्ये रोमान्स करत होते.

पत्नी पुढे म्हणाली, 'दोघांना एकत्र पाहताच मी गाडीची काच फोडली आणि काच खाली करायला सांगितली. मी म्हणाले की मला काहीतरी बोलायचे आहे. पण कमलकिशोर मिश्रा यांनी माझे ऐकले नाही आणि गाडी वळवून पळू लागला. मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही आणि माझ्यावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे माझ्या डोक्याला खूप दुखापत झाली आहे.

पत्नीच्या आरोपांवर कमल किशोर मिश्रा यांचे अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. कमल किशोर मिश्रा हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी भूतियापा, फ्लॅट नंबर 420, शर्मा जी की लग गई, देहाती डिस्को, खली बाली यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2019 मध्ये त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले. तो यूपीचा रहिवासी आहे.



हेही वाचा

बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने ट्रान्सजेंडरवर हल्ला

गिरगाव : पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग, शिवसेना कार्यकर्ता जखमी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा