धक्कादायक ! मुंबईतूनच होतोय दहशतवादाला आर्थिक पुरवठा, ५ वर्षात विकले १५०० कोटींचे ड्रग्स


धक्कादायक ! मुंबईतूनच होतोय दहशतवादाला आर्थिक पुरवठा, ५ वर्षात विकले १५०० कोटींचे ड्रग्स
SHARES

NCB च्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज फँक्ट्रीवर कारवाई करत, डी गँगचे कंबरड मोडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची रोकड आणि ड्रग्ज हस्तगत करत डी गँग मधील मोठ्या तस्करांना अटक केली. मात्र आरोपींच्या चौकशी मागील ५ वर्षात या टोळीने तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकून काही हजार कोटी रुपये कमवल्याचे समोर आल्यानंतर या गुन्ह्यांची व्यापक्त किती आहे हे लक्षात येते.

हेही वाचाः- डोंगरीतून सुरू असलेल्या 'डी गँग'च्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

NCB चे अधिकारी समीर वानखडे हे सध्या डी गँगसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दोनच दिवसांपूर्वी वानखडे यांच्या नेतृत्वा खाली NCB ने डोंगरी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टीवर कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान NCB ने २ कोटी १८ लाखांची रोकड आणि १२ किलो ड्रग्जसह शस्त्रही हस्तगत केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणसह तिघांना अटक केली होती. आरोपींच्या चौकशीत आणि त्यांच्याजवळ मिळालेल्या डायरीतून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने मागील ५ वर्षात तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकून हजारो कोटी रुपये हवाला मार्फत ‘डी गँग’ला पाठवल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर चिंकू पठान यांच्याजवळ आढळलेल्या डायरीत पोलिसांना दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि फहिम मचमच यांच्याही नावाचा उल्लेख आढळून आला आहे.

हेही वाचाः- NCB अधिकाऱ्यांची डोंगरीत मोठी कारवाई, करोडो रुपयांची रोख आणि ड्रग्ज जप्त

दरम्यान, NCB पथकाचे अधिकारी समीर वानखेडेंनी शुक्रवारीही डोंगरी परिसरात ४ ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. सोनं तस्करीची चैन तुटल्यानंतर डी गँगने ड्रग्ज तस्करी करण्याचं ठऱवल्याचं आरोपींच्या चौकशीतून समोर आलं आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाई दरम्यान NCBने  दाऊदच्या आणखी एक साथीदार सलमान नासिर पठाण याला अटक केली आहे. डोंगरी परिसरात अजूनही छापेमरी सुरू आहे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. ड्रग्स तस्करीतून दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीची ही जप्त केली जाणार आहे. त्याच बरोबर या सर्व गुन्ह्यांसंदर्भाची माहिती ईडी आणि एनआयएला देखील देणार आहे. काही दिवसात मुंबईतून दाऊदची दहशत संपवणार आणि ड्रग्ज तस्करीला कायमचा ब्रेक लावण्याचा दावा NCB चे अधिकारी समीर वानखडे यांनी केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा