डोंगरीतून सुरू असलेल्या 'डी गँग'च्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश


डोंगरीतून सुरू असलेल्या 'डी गँग'च्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश
SHARES

मुंबईच्या डोंगरी परिसरत चालणाऱ्या डी गँगच्या ड्रग्ज फँक्ट्रीचा NCB ने पर्दाफाश केला आहे. ही फँक्ट्री चालण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान NCB ने तब्बल १२ किलो ड्रग्ज आणि २.१८ कोटीची रोकड NCB ने जप्त केली आहे. ही फँक्ट्री चालवणारा सराईत आरोपी आरिफ भुजवीला (५८)हा सध्या फरार आहे.  त्याला पकडण्यासाठी NCB ने लूक आऊट नोटीस जारी केली आहे.


मुबई NCB च्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे. NCB ने गेल्या काही दिवसांपासून मुंबई अंमली पदार्थाची तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, NCB ने गँगस्टर चिंकू पठाण आणि त्याचा साथीदार नझीम हक याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि घात शस्त्रही आढळून आले आहेत. पोलिसांची कूण कूण लागावी म्हणून चिंकूने तो राहत असलेल्या गल्लीत कँमेरे लावले होते. ऐवढच काय तर घरात कुणालाही प्रवेश नव्हता. अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून त्याने घराबाहेर बायोमॅट्रीक मशीन लावली होती. या कारवाईतून मिळालेल्या माहितीच्या आधारावरचं NCB ने भिंवडीत एक कारवाई करत, या टोळीचा हस्तक रोहित वर्मा याला NCB ने अटक केली. यावेळी अटकेची कारवाई टाळण्यासाठी रोहितने अनेक उचापती केल्या, परिसरातील नागरिकांना जमवून गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. मात्र  NCB च्या अधिकार्यांसमोर काहीच चालत नसल्याने सुटकेसाठी त्याने अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. 


 ही वाचाः- IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी


रोहितच्या आणि चिंकू पठानच्या अटकेनंतर काही तासात NCB ने डोंगरीच्या नूर मझिल मध्ये मोठी कारवाई केली. या इमारतीचा संपूर्ण पाचवा मजला हा आरिफचा होता. या कारवाई दरम्यान NCB चे अधिकारी या तस्करी मध्ये असलेला मुख्य सूत्रधार आरिफ भुजवीला (५८) याला पकडण्यासाठी  गेले होते. मात्र चिंकू आणि रोहितच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर आरिफने घरातून पळ काढला. आरिफच्या घरातल्यांना ही त्याला पळून जाण्यास मदत केली. NCB  ने आरीफच्या घराची झडती घेतली असता. आरिफने घरातल्या एका खोलीतच ड्रग्ज बनवण्याची फँक्ट्री सुरू केली होती. NCB ला ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. NCB  ने या कारवाईत २.१८ कोटी रोकड आणि १२ किलो ड्रग्ज जप्त केले आहे.  ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटीहून अधिक किंमत आहे. आरिफच्या घरातही NCB ला एक स्मिथ वासन कंपनीचे रिव्हाल्वर सापडले आहेे. त्याच बरोबर घरात ८ ते ९ महागड्या कारच्या चाव्या सापडल्या आहेत. NCB च्या अधिकाऱ्यांना आरिफच्या ड्रग्ज फँक्ट्रीतून २ ते ३ डायरी सापडल्या आहेत. त्यात त्याने ड्रग्ज संदर्भातले व्यवहार लिहून ठेवले आहेत. अंदाजे ५ ते ६ वर्षापासून आरिफ ही लँब चालवत असल्याचा अंदाज NCB च्या अधिकाऱ्यांना आहे. या ड्ग्ज तस्करीतूून मिळणार्या पैशांवर आरिफ मौजमजा करत होता. 

'डी गँग' कनेक्शन 

मुंबई महाराष्ट्रात आरिफ ह सर्वात मोठ ड्रग्ज डिलर असून हा ड्रग्ज माफिया कैलास राजपूत गँगसाठी काम करत होता. कैलास राजपूत आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हे या तस्करीतील मुख्य सूत्रधार आहेत. आता पर्यंतलही टोळी सात देशांमध्ये विविध प्रकारच्या खाण्याच्या पाकिटातून ड्रग्जची तस्करी करत होती. नुकतीच ही टोळी साखरेच्या पाकिटातून ड्रग्ज दुबईला पाठवणार होते. मात्र NCB च्या कारवाईमुळे त्यांचा प्रयत्न फसला. NCB च्या या कारवाईचा मोठा फटका डी गँगला पडला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा