NCB अधिकाऱ्यांची डोंगरीत मोठी कारवाई, करोडो रुपयांची रोख आणि ड्रग्ज जप्त


NCB अधिकाऱ्यांची डोंगरीत मोठी कारवाई, करोडो रुपयांची रोख आणि ड्रग्ज जप्त
SHARES

प्रसिद्ध वेब सिरिज ‘सेक्रेड गेम’ मध्ये दाखवलेल्या एका दृश्यात आरोपीचा माग काढताना अभिनेता सैफ अली खानला एका घरात ज्या प्रमाणे  पैशांनी भरलेली खोली आढळून येते. तसाच एक अनुभव एका कारवाई दरम्यान NCB च्या अधिकाऱ्यांना आला आहे. गँगस्टर चिंकू पटानच्या  चौकशीतून मिळालेल्या माहिती आधारे NCB च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी डोंगरीत कारवाई केली. त्या कारवाईत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची रोकड आणि ड्रग्ज मिळून आले आहे.

हेही वाचाः- संभाजी बिडीचं नाव बदललं, आता या नावानं ओळखली जाणार बिडी

मुंबई NCB च्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे. NCB ने गेल्या काही दिवसांपासून मुंबईl अंमली पदार्थाची तस्करी करण्याचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, NCB ने गँगस्टर चिंकू पठाण पकडले आहे. त्याला नवी मुंबईतील घनसोली येथून अटक करण्यात आली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि घात शस्त्रही आढळून आले आहेत.  NCB ची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक आहे. तसंच तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबईत अंमली पदार्थांची तस्कारी करणाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

हेही वाचाः- IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी

चिंकूच्या चौकशीतून NCB च्या अधिकाऱ्यांनी डोंगरीत बुधवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत संशयित आरोपीच्या घरी पोलिसांनी चक्क काही कोटी रुपयांची रोकड आढळून आली. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात ड्रग्जही सापडले आहे.  NCB च्या एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा मुंबईतला सर्वात मोठा ड्रग्ज डिलर असल्याचे कळते. मध्यरात्री उशिरपर्यंत NCB ची ही कारवाई सुरू होती. या तस्करी मागे डी गँगचाही सहभाग असल्याचा संशय NCB च्या अधिकाऱ्यांना आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा