आरे कॉलनीत आगीचा भडका

आरे कॉलनी - मुंबईतल्या आरे कॉलनीमधील जंगलात आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ही आग वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे पेट्रोल पंपाजवळील जंगलात लागली. मात्र ही आग लागली नाही तर लावण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

मेट्रोच्या प्रोजक्टसाठी आरे कॉलनीतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार आहे. मात्र स्थानिकांनी याला विरोध केला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या. 

आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. वनराई पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे.

Loading Comments