• घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आग
  • घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत आग
SHARE

घाटकोपर - रमाबाई कॉलनीमध्ये डी. बी. पवार चौकातल्या चाळीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गुरुवारी सायंकाळी ८ वाजता लक्ष्मी देवेंद्र या महिलेच्या दोन मजली घराला आग लागली. या आगीत लक्ष्मी यांनी भाड्यानं दिलेल्या घरात राहणारा मनोज वानखेडे जखमी झाला असून त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीवर रात्री नऊ वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आलं. शॉर्ट सर्किट नेमकं कशामुळे झालं, ते स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या