क्रॉफर्ड मार्केटमध्ये इमारतीला आग

क्रॉफर्ड मार्केट - पलटन रोडवरील मच्छी मार्केटमागे एका कोपऱ्यावरील इमारतीत गुरुवारी आग लागली. ही आग संध्याकाळी 5.15च्या सुमारास लागली. या इमारतीत ड्रिलिंग आणि वेल्डिंगचं काम सुरू होतं. या कामाच्या वेळी बाजूला पडलेल्या चिंध्यांवर ठिणग्या पडल्या आणि आग भडकली.

ही इमारत महानगरपालिकेची आहे. पूर्ण इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. विशेष म्हणजे इमारत रिकामी असल्यानं अनर्थ टळला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी अग्निशमन दलाच्या गाड्या येण्या आधीच आग विझवली.

Loading Comments