शॉर्ट सर्किटमुळे आग

मुलुंड - मंगळवारी रात्री 9 वाजता मुलूंड येथील, सर्वोदय नगरमधील सर्वोदय इमारती मध्ये पाचव्या मजल्यावर एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागलीय. अचानक लागलेल्या आगीमुळे घरमालक जेसानी व इमारतीमधील लोकांची एकच तारांबळ उडालीय. घरमालक हे पेशानं वकील असल्यामुळे घरात अनेक महत्वाची कागदपत्रे होती आणि त्यामुळे आग जास्त पसरली. आग लागताच सोसायटीच्या सुरक्षारक्षकानं इमारतीची विद्यूत सेवा खंडित केली आणि सर्वांना बाहेर काढले. सुदैवाने कोणाला काही झालं नाही.

Loading Comments