ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चालत्या कारला आग

मुलुंड - ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुलुंडजवळ एका चालत्या कारला अचानक आग लागली. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

कारमध्ये चालक एकटा होता. त्याने प्रसंगावधान राखत कार थांबवून तो कार बाहेर आला. लगेचच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. पण, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. यामुळे मुंबई बाहेर जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

Loading Comments