प्रोड्युसर नाडियादवालांच्या बॉडीगार्डचा पोलिसावर हल्ला

जुहू - मुंबईच्या जुहू परिसरात ऑन ड्युटी ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबलवर प्रोड्यूसर फिरोज नाडियादवाला यांच्या बॉडीगार्डनं हल्ला केला. बाबू पाटील असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून, समर खान यानं त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना गुरूवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास घडली. फिल्म प्रोड्यूसर फिरोज नाडियादवालांची स्कॉर्पिओ डबल पार्किंगमध्ये उभी होती. चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंगमध्ये उभी असल्यानं इतर वाहनांना अडथळा होत होता. बाबू पाटील यांनी ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड समर खानला गाडी काढायला सांगितली. याचा राग आला आणि समर खाननं पोलीस कॉन्सटेबलवर हल्ला केला. या हल्ल्यात पाटील यांच्या मानेला आणि पायाला इजा झाली असून, त्यांचा मोबाइल आणि इ-चलान मशीनही तुटली. याप्रकरणी जुहू पोलीस स्टेशनने फिरोज नाडियादवाला यांचा बॉडीगार्ड समर खानवर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू केला आहे.

Loading Comments