कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक, ५ जणांना अटक

कमी व्याजदरात करोडो रुपयांचं कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली या टोळीने अनेकांना गंडा घातला आहे.

कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक, ५ जणांना अटक
SHARES

कमी व्याजदरात कर्ज देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ५ जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे.  शोहेब कासम चांदीवाला, विजय ग्रोव्हर, हिरेन किशोर भोगायता, शफिक बाबूमियाँ शेख उर्फ मामू आणि रवींद्र बाबुराव कामत अशी आरोपींची नावे आहेत. 

कमी व्याजदरात करोडो रुपयांचं कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली या टोळीने अनेकांना गंडा घातला आहे.  ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापारांना आणि छोट्या- मोठ्या व्यावसायिकांना सोशल मिडीयाद्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात मोठं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवत होती. गुंतवणूक तसेच व्यवसाय करण्यासाठी पैशांची गरज असलेल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. त्यामुळे  गुन्हे शाखेच्या युनिट ११च्या पथकाने तपास सुरू केला होता. 

कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देणारी मोठी टोळीच यामागे कार्यरत असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला. ही टोळी मालाड येथील हॉटेल लँडमार्क येथे अशाच एका कामासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी या टोळीतील ५ जणांच्या मुसक्या आवळल्या. 



हेही वाचा -

शिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा

महापरिनिर्वाण दिन: 'या' गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा