Advertisement

शिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा

राज्य सरकारकडून १०१९ पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीची जाहिरातही काढण्यात आली आहे.

शिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा
SHARES

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन चार दिवसही उलटले नाहीत. मात्र सरकारने बेरोजगारांना एक खूशखबर दिली आहे. राज्य सरकारकडून १०१९ पोलीस शिपाई चालक पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीची जाहिरातही काढण्यात आली आहे. 

पोलीस शिपाई चालकांच्या जागा राज्यभरात भरण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, रायगड, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अकोला, बुलढाणा आदी ठिकाणी पोलिस शिपाई चालकाची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण अशी आहे. तर खुल्या गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत) आहे.  अर्ज करण्याची अंतिम तारीख  २२ डिसेंबर २०१९ आहे. 


या ठिकाणी भरती

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा
पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा
पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड – २७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग – २० जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी – ४४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली – ७७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. – ४१ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना – २५ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद – ३३ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर – ६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. – २८ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा – ३६ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा – ३७ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला – ३४ जागा
पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा – ५२ जागा



हेही वाचा -

मुंबईत 'इतके' दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबईसह नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा