मुंबईत २ वर्षांत 'इतक्या' वाहनांची चोरी


मुंबईत २ वर्षांत 'इतक्या' वाहनांची चोरी
SHARES

मुंबईतून गेल्या २ वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीची असल्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या गाडीचा वापर करण्यात आला आहे.

मुंबईतून २ वर्षांत जवळपास ५ हजार ४९४ वाहने चोरीला गेली. त्यापैकी २ हजार वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित वाहनांचा शोध अद्याप लागलेला नाही. गुन्हा करण्याबरोबरच, गुन्हा केल्यानंतर पलायनासाठी, अतिरेकी कारवायांमध्ये स्फोटके, शस्त्र वाहून नेण्यासाठी, स्फोटके पेरण्यासाठी या वाहनांचा वापर करण्यात आला.

अतिरेकी संघटनांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात, विशेषत: एकल आत्मघातकी हल्ल्यांत (लोन वूल्फ अ‍ॅटॅक) चोरीची वाहने उपयोगात आणण्यात आली.  इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने २००८मध्ये गुजरातच्या अहमदाबाद, सुरत शहरांमध्ये २१ बॉम्ब (इंप्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) पेरले होते. यापैकी बहुतांश बॉम्ब व्ॉगन आर आणि तत्सम मोटरगाडय़ांमध्ये ठेवून त्या रुग्णालयांबाहेर उभ्या करण्यात आल्या होत्या. यातील चार व्ॉगन आर गाडय़ा नवी मुंबईतून चोरी करण्यात आल्या होत्या. तत्कालीन एटीएस पथकाने या गाडय़ा चोरणाऱ्या मोहम्मद मोईन अब्दुल शकुर खान ऊर्फ इरफान आणि अयुब राजा अमीन शेख या दोन चोरांना अटक केली.

Read this story in English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा