गांधी जयंतीनिमित्त ५ हजार खटले चर्चेअंती निकाली


गांधी जयंतीनिमित्त ५ हजार खटले चर्चेअंती निकाली
SHARES

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे महाराष्ट्रातील दंडाधिकारी न्यायालयात ५२०२ गुन्हे चर्चेअंती निकाली काढण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अॅड श्रीकांत कुलकर्णी यांनी गांधी जयंतीनिमित्त किल्ला कोर्टात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती दिली. महत्वाचं म्हणजे हे सर्व गुन्हे चेक बाऊन्स संदर्भातील आहेत.

महात्मा गांधीजींची शिकवण

याबाबत अधिक माहिती देताना कुलकर्णी म्हणाले की, महात्मा गांधी आपल्या वकिली पेशाच्या काळात जेव्हा एखादा खटला हाती घ्यायचे, तेव्हा न्यायालयात जाऊन खटला लढवण्याआधी ते दोन्ही पक्षाला एकमेकांसमोर बोलवून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचे. त्यातून दोन्ही पक्षाला उचित न्याय मिळायचा. याच पद्धतीचा अवलंब करून आम्ही देखील न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेले खटले निकाली काढण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे महाराष्ट्रातील दंडाधिकारी न्यायालयात ५२०२ गुन्हे चर्चेअंती निकाली काढण्यात आले. 


हेही वाचा -

निर्दयी बापाची मुलाला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा