निर्दयी बापाची मुलाला बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

चुन्नाभट्टी पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहचल्यानंतर पोलिसांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून हालचाल केली. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने हा व्हिडीओ आणि त्यातील व्यक्ती कुर्लाच्या कसाईवाडा येथील असल्याचं पुढं आलं.

SHARE

क्षुल्लक कारणांवरून ४ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हिडिओ अवघ्या काही तासात सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली. या नराधम पित्याला आता चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली आहे. अझरूद्दीन शेख (३०) असं त्याचं नाव आहे. पत्नीसोबत झालेल्या वादाचा राग तो या मुलावर काढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  

कुर्लाच्या कसाईवाडा परिसरात अझरूद्दीन शेख हा पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. छोटे-मोठे काम करून तो घर चालवत होता. मात्र त्याचे पत्नीसोबत वारंवार खटके उडायचे. पत्नीवरील राग तो मुलांवर काढायचा. शनिवारी देखील पत्नीसोबत झालेल्या वादातून त्याने त्याच्या चार वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली. पत्नीला कंटाळून मुलाला मारहाण करीत असल्याची माहिती तो माहेरच्या व्यक्तींना देण्यासाठी त्याने हा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली.

चुन्नाभट्टी पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहचल्यानंतर पोलिसांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून हालचाल केली. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने हा व्हिडीओ आणि त्यातील व्यक्ती कुर्लाच्या कसाईवाडा येथील असल्याचं पुढं आलं. त्यानुसार पोलिसांनी कसाईपाडातून अझरूद्दीनला बाल न्याय काळजी आणि हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केली.हेही वाचा -

पीएमसी बँक गैरव्यवहारा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून आजीने नातीला सहाव्या माळ्यावरून फेकले
संबंधित विषय
ताज्या बातम्या