मुंबईच्या आकाशात पुन्हा ड्रोन


SHARES

माहीम - मिठी नदीच्या सर्व्हेसाठी ड्रोन उडवणारी ही मुले पहा. कागदोपत्री पालिकेची तसंच पोलिसांची परवानगी असली तरी दुपारी 3 पर्यंतच्या वेळेचं बंधन झुगारून दोन ड्रोन आकाशात उडत होते. नेमके त्याच वेळी मुंबई लाइव्हचे प्रतिनिधी तिथून जात होते आणि त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना व्हिडिओ चित्रण करण्यासाठी रोखण्यात आले.

मुंबईत ड्रोनबंदी असताना भरदिवसा हाफ चड्डीतली मुलं फ्रिशमन प्रभू या कंपनीसाठी ड्रोन उडवत होती. तिथंच उभ्या असलेल्या पोलिसालाही यात फारसं आश्चर्य वाटलं नाही हे त्यात आणखी धक्कादायक होतं. अखेर, मुंबई लाइव्हच्या प्रतिनिधींनी याबाबत चौकशी केल्यावर पोलिसाने तात्काळ वायरलेस 'व्हॅन'ला बोलावले. वेळेचे बंधन संपल्यावरही ही मुलं ड्रोन उडवत राहिल्याबद्दल पोलिसांनी थोडीशी चौकशी केली आणि कागदपत्रं बघून त्यांना सोडून दिलं. धक्कादायक बाब म्हणजे, त्याचवेळी मुख्यमंत्री या पासून जवळच तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन करत होते. आता, गृहखात्यानेच केलेली ड्रोनबंदी आणि त्याबाबत बनवलेल्या नियमांना धाब्यावर बसवण्याचा मुद्दा लक्षात घेता यापुढेही मुंबईच्या आकाशात असे ड्रोन दिसत राहिले तर आश्चर्य वाटायला नको.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा