कुंड्या झाडाच्या, बाटल्या दारूच्या!


  • कुंड्या झाडाच्या, बाटल्या दारूच्या!
  • कुंड्या झाडाच्या, बाटल्या दारूच्या!
  • कुंड्या झाडाच्या, बाटल्या दारूच्या!
  • कुंड्या झाडाच्या, बाटल्या दारूच्या!
SHARE

अंधेरी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचा सर्वत्रच गाजावाजा होत आहे. मुंबईत मात्र वेगळंच चित्र पहायला मिळत आहे. अंधेरीमध्ये महापालिकेकडून सुशोभिकरणासाठी जागोजागी वृक्षारोपण केलं गेलं. अनेक ठिकाणी कुंड्यांमध्ये रोपं लावून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्याचाही प्रयत्न झाला. मात्र या आदर्श विचाराचे तीनतेरा वाजल्याचं चित्र सध्या अंधेरीत पहायला मिळत आहे.

वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी लावण्यात आलेल्या कुंड्यांमध्ये कचरा, पिशव्या एवढंच काय तर चक्क दारूच्या बाटल्या देखील पहायला मिळत आहेत. अंधेरी पूर्वकडे स्थानकाबाहेर भिंतीलगतच या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कुंड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या कुंड्यांमध्ये प्रवासी येता-जाता कचरा टाकत आहेत. सध्या या कुंड्या झाडाच्या कमी आणि पिंकदाण्याच जास्त वाटाव्यात अशी परिस्थिती. त्यामुळे वृक्षारोपणासारख्या चांगल्या योजनेचीच कचरा कुंडी होत चालली आहे.

या प्रकाराबाबत के पूर्व पालिका विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांना विचारले असता त्याबाबत माहिती घेण्यात येईल व पुढील कारवाई होईल असे आश्वासन त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या