आगीमुळे लाखोंचं नुकसान

 Ramabai Colony
आगीमुळे लाखोंचं नुकसान

रमाबाई कॉलनी - चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील रमाबाई कॉलनीतील आबा सरोदे यांच्या घरावर जळतं रॉकेट (फटाका) पडून घराला आग लागली. यामध्ये घरातल्या लाखोंच्या सामानाचं नुकसान झालंय. त्यांच्या मोठ्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न आहे. त्यामुळे कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी त्यांनी केली होती. ते सर्व सामान जळून खाक झालं. या आगीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पण तोपर्यंत घरातला फ्रीज, कपाट, कपडे, दागिने खाक झालं होतं, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी सांगितलं. या कुटुंबाला भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी दिलंय. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नाही.

Loading Comments