ऑनलाइन एका बिअर बाटलीसाठी त्याला मोजावे लागले 1 लाख 30 हजार, टिळकनगरमधील घटना


ऑनलाइन एका बिअर बाटलीसाठी त्याला मोजावे लागले 1 लाख 30 हजार, टिळकनगरमधील घटना
SHARES
 देशात सध्या कोरोना या संसर्ग रोगाचे थैमान सुरू असल्याने सर्वञ संचार बंदी आहे. अत्यावश्यक दुकाने वगळता हाँटेल, शाळा महाविद्यालय, बार सर्व बंद केले आहेत. त्यामुळे रोजची लागणारे तळीराम अस्वस्थ झाले आहेत. दारूची तलप भागवण्यासाठी  त्याने अखेर आँनलाईन दारूची बाटली मागवली.  माञ या एका बाटलीच्या नादात त्याने तब्बल 1 लाख 30 हजार गमवले.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असुन, याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशांत लॉकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे अनेकजणांनी घरातच राहत काही जीवनावश्यक वस्तू अथवा खाण्या-पिण्याच्या वस्तुंची ऑनलाईन ऑर्डर देत त्या घरी मागविण्यास सुरुवात केली आहे. अशातच चेंबुर येथील दाम्पत्याने ऑनलाईन बिअर शॉपीचा नंबर घेत त्या क्रमांकावरुन बिअरची ऑर्डर दिली.

मात्र समोरील व्यक्तीने ऑनलाइन तीन हजार रुपये भरण्या सांगितले. यावेळी पतीने पत्नीच्या क्रेडीट कार्डवरुन पैसे भरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तांत्रिक कारणामुळे बिल भरले जात नसल्याने, समोरील व्यक्तीने ओटीपी क्रमांक मागवुन घेतला. त्यावेळी काही क्षणात 30 हजार रुपये काढल्याचा मेसेज पत्नीच्या मोबाईलवर आला. त्यानंतर टप्याटप्याने एक लाख रुपये काढल्याचा संदेश आल्याने, या महिलेने तत्काळ क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. तर याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. माञ अशा प्रकारेच फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा काही दिवसांपूर्वी वांद्रे पोलिसांनी पर्दाफाश केला होता.


अशा प्रकारे नागरिकांना लुबाडण्यासाठी सायबर चोरांनी गुगलवरील काही उच्चभ्रू परिसरातील हाँटेलच्या संपर्क ठिकाणी स्वत:चे नंबर टाकले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपण संबधित दुकान किंवा हाँटेलमध्ये फोन लागला असल्याचा भास होतो. आँर्डर दिल्यानंतर ग्राहक विश्वासाने त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती फोनवरील व्यक्तीला देतात आणि अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडतात. त्यामुळे नागरिकांनी सावधान रहावे. शक्यतो आँनलाईन व्यवहार करताना खाञी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा